यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्या तालुक्यातील मोहराळे येथील तरूणाच्या विरोधात यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, मोहराळे या गावात राहणारा नागेश्वर उर्फ नागो कैलास अडकमोल ( वय २० वर्ष ) या तरूणाने दिनांक ७ जुलै रोजी त्याच्याकडील मोबाइलवर दोन थोर पुरूषांचा अपमान होईल दुसर्या समाजाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान करणारे स्टेटस ठेवले होते. या माध्यमातून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गावातील काही मुलांच्या मोबाइलवरून त्यांनी हे स्टेटस पाहिले गेल्याने खळबळ उडाली. यामुळे संबधीत तरूणांनी तात्काळ गावाचे पोलीस पाटील युवराज पाटील यांच्या निर्दशनात ही बाब आणुन दिली. या अनुषंगाने पोलीस पाटील यांनी वेळीच दखल घेत गावात दोन समाजात तेढ निर्माण होण्या आधीच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेवुन याबाबत तक्रार दिले.
या संदर्भात पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादी वरून स्टेटस ठेवणार्या संशयीत तरुण नागेश्वर कैलास अडकमोल याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चौहाण व पोलिस करीत आहेत.