यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक

yaval bajar samiti meeting

yaval bajar samiti meeting

यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावल मध्ये व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक सभागृहात पार पडली.

नुकतीच व्यापार्‍यांनी आपले परवाने संबंधातील महत्त्वाची कागदपत्र आवश्यक असलेली दहा दिवसात जमा करावी अशी सूचना सचिव एस. बी. सोनवणे यांनी बाजार समितीतर्फे व्यापार्‍यांना पत्राव्दारे दिली होती. त्यानुसार व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बैठकी व्दारे चर्चा करण्या संदर्भात विषय मांडला या मागणी प्रातिसाद देत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी परिसरातील शेतकरी व व्यापारी उपास्थित होते. या बैठकीत विविध विषय आणी अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात शेतकरीवर्ग हा व्यापार्‍यांच्या विश्‍वासावर आपला माल विकत असतो मात्र याच मालाचे पैसे मिळण्यास शेतकरार्‍यांना हेलपाटेखावे लागतात अशा तक्रारी वाढल्या असुन त्या अनुषंगाने शेतकरी यांच्या हिताच्या दृष्टीने दक्षता घेवुन सचिव एस. बी. सोनवणे यांनी ज्या व्यापार्‍यांचे परवाने अपडेट नाहीत त्यांचेकडून काही महत्त्वाची कागदपत्र व जामीन रोख भरून घेण्यासंदर्भात पत्र दिलेले असल्याची माहीती सांगीतली.

दरम्यान, शेतकर्‍यांचा माल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांची वृत्ती व मानसिकता समन्वयाद्वारे शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याची असावी असे व्यापारी आणी शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनपर झालेल्या बैठकीच्या चर्चेतुन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. या चर्चेत यावल येथील जेष्ठ व्यापारी हाजी शब्बीर खान, साकळी येथील रूउफोद्दीन शफीउद्दीन, तय्यब मेंबर ,विजय भारंबे, रघुनाथ कोळी ,शरद यावलकर, संतोष खर्चे, डॉ. निलेश गडे यांच्यासह आदींनी भाग घेतला ,सभापती भानुदास चोपडे ,उपसभापती राकेश फेगडे, संचालक मुन्ना पाटील माजी सभापती तथा संचालक नारायण चौधरी ,सुनील बारी व्यापारी प्रतिनिधी अशोक चौधरी, पुंजू डिंगबर पाटील, यांच्यासह संचालक तसेच शेख अख्तर शेख चांद, शेख एजाज शेख कादर, नईम खान, शफी खान निसार खान, अजित खान, पंकज कुरकुरे, रवींद्र वाघ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व व्यापारी बांधव मोठया संख्येने या वेळी उपस्थित होते.

Protected Content