
फैजपूर प्रतिनिधी । शहरातील तडवी वाडा येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे आज दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला असून यानिमित्त शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, तडवी वाडा येथून न्हावी दरवाजा मार्गे खुशालभाऊ रोड अशी काढण्यात येऊन सुभाष चौक येथील डॉ., बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच रॅली येथील पालिकेत नेऊन पालिका सभागृहात आदिवासी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष रशीद तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून रशीद तडवी हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या रॅली व कार्यक्रमाला फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे जेष्ठ पदाधिकारी व फैजपुरियन ग्रुप, आदिवासी तडवी भिल्ल कृती समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी रॅलीला माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा.एस.एस पाटील, सुनील वाढे, भुसावळचे सचिन चौधरी, धिरज चौधरी, इंजिनिअर संजय वाणी यांनी भेट दिली. दरम्यान या महारॅलीत सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपरिक सजीव देखावा सादर करण्यासाठी व वीर एकलव्य, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा तडवी, तंट्या भिल्ल, ख्वाज्या नाईक, राघोजी भांगरे, महानायक भिमा नाईक, तडवी भिल्ल महानायक, तडवी भिल्ल समाजप्रेरक उखर्डू कासम तडवी या महापुरुषांचे देखावा सादर करण्यात आले. हे सर्व देखावे फैजपूरकरांना पहिल्यांदाच पाहवयास मिळाले. पारंपरिक आदिवासी देखाव्याची सर्वस्वी जबाबदारी “तडवी फैजपूरीयन्स गृप” सदस्यांनी घेतली होती. तर रॅलीचे ठिकठिकांनी स्वागत करण्यात आले. यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जिजाबरव पाटील, गोपनीय पोलीस यशवंत टाहाकळे, मोहन लोखंडे, सहाययक फौजदार हेमंत सांगळे, पोकॉ किरण चाटे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आदिवासी कृती समितीचे युनूस तडवी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.


