Home क्राईम दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले; तीन तरूण गंभीर जखमी

दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले; तीन तरूण गंभीर जखमी

0
26

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हंबर्डी गावाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविल्याने झालेल्या अपघातात तीन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर आज हंबर्डी गावाजवळ एमएच १९ बीवाय-४२१३ या क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून यावरील स्वार तीन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुचाकीवर हर्षल मनोज घारू ( वय १९, रा. यावल); वासू गैची (रा. यावल) आणि एक अन्य तरूण असे तिघे जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound