प्रताप कॉलेजच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची समस्या कायम !

अमळनेर प्रतिनिधी | येथील प्रताप कॉलेजमधील परीक्षा देऊनही गैरहजर दाखवत अनुत्तीर्ण केलेल्या टि.वाय.बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर अजूनही तोडगा निघालेला नसल्याचे विद्यार्थी त्रस्त झाले असल्याने युवा सेनेने आंदोलन केले.

सविस्तर वृत्त असे की, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील टी. वाय. बी. एससीच्या काही विद्यार्थ्यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आले. तसेच त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत नापास देखील करण्यात आले आहे. या प्रकरणी आधी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. तर याविषयी अद्यापही तोडगा निघाला नाही म्हणून युवा सेनेने उप जिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

दरम्यान, या प्रकरणी प्राचार्य पी. आर. शिरोडे यांनी आपण सोमवारी प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन याबाबत भूमिका मांडणार असल्याची ग्वाही दिली. यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी शिव वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख शेखर पाटील, युवा सेनेचे अमर पाटील, युवती सेनेच्या दक्षता जाधव, शहर प्रमुख जयश्री बैसाणे, दीपिका पाने, मयूरी बागुल, सपना मोरे, धनश्री सणस आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content