यावल (प्रतिनिधी)। येथील यावल ते भुसावळ जाणाऱ्या मार्गावर आज सांयकाळच्या सुमारास प्रवाशी वाहतुक करणाऱ्या मिनिडोअर या वाहनाने झाडाला धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात 13 वर्षीय मुलगी मरण पावली असुन, चालकासह आठ प्रवाशी जखमी झाले आहे, यात चार जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी आज दिनांक १७ मे रोजी सांयकाळी ५ ते ५.३०च्या सुमारास यावलहुन भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील यावल शहरापासुन सुमारे ३ किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या पाटचारीच्या अलीकडील भागास रोडा च्या कडेला असलेल्या झाडाला यावल येथुन प्रवाशी बसवुन निमगाव कडे निघालेल्या मिनिडोअर क्रमांक (एमएच १९, ७३४२) वरील वाहक सुनिल दामु कोळी रा. निमगाव तालुका यावल यांच्या ताब्यात असलेल्या या वाहनाने रोडाच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात भूमीका पुंडलीक कोळी (वय-13), संगीता शिवदास धनगर (वय- 32), प्रिती शिवदास धनगर (वय-२२), कौसाबाई देवराम धनगर (वय-62), सुन्दर बाई मधुकर पाटील (वय-61), वत्सला अभिमान धनगर (वय-43), सजाबाई पुंडलीक धनगर (वय-35) हे सर्वेजण आज शुक्रवार हे यावलच्या आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजार आटोपुन आपल्या घरी निमगाव येथे जात असतांना हे सर्व या अपघातात जखमी झाले असुन, सर्व जणांवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सांगोळे यांनी व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यानी तात्काळ प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
चार जणांची प्रकृती गंभीर
यातील संगीता शिवदास धनगर, भुमिका पुंडलीक कोळी, सुंदरबाई मधुकर पाटील, कौसाबाई देवराम धनगर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले, भुमिका कोळी व वाहनचालक सुनिल कोळी यांना उपचारासाठी भुसावळ येथे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.