यावल प्रतिनिधी | येथील नगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून एका अधिकार्याला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील नगरपालिकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली. यात जळगाव येथील पथकाने सापळा रचून पालिकेतील एका अधिकार्याला ताब्यात घेऊन जळगावकडे प्रयाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज कारवाई करण्यात आलेला अधिकारी हा वरिष्ठ असून त्याला लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भातील अधिक तपशील देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिकेतील लाचखोरीबाबत अनेकदा चर्चा होत असली तरी आज थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादांशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.