यावल येथे सन्मान निधी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांचा आढावा

 

yaval 1

यावल (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत येणाऱ्या पात्र शेतकऱ्यामधुन लाभ मिळालेल्या व लाभ न मिळालेल्या अशा शेतक-यांचा संदर्भात येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतक-यांचा येथील तहसील कार्यालयात आढावा घेण्यात आला असून, त्यातील वंचित शेतक-याचे पासबुक खाते क्रमांक, आधार कार्ड, तात्काळ गोळा करण्याचे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी सुचना केली आहे.
कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, आणि तलाठी हे नोडल अधिकारी म्हणून राहणार असून त्यांनी तात्काळ वंचित शेतक-यांचे अकांउंट बाबतची माहीती गोळा करून, वरिष्ठांनाकडे अहवाल सादर करावा. अशा सुचना प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी बैठकीत दिल्या आहे. बैठकीस तहसीलदार जितेंद्र कुंवर निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार मुक्तार तडवी, प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, कृषी अधिकारी एल. व्ही. तळेले यांच्यासह इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी रोजगार हमी योजने अंतर्गत येणारी जलसंधारण च्या कामासंदर्भात योग्य दिशेने कार्य करण्याच्याही सुचना दिल्या, याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना रोजगार हमी योजने अंतर्गत गावागावात जास्तीत जास्त नांदेद पॅर्टननुसार शोषखड्डे तयार करण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांना अधिक प्रोत्साहीत करावे. अशा सुचना दिल्या आहेत. शोष खडयामुळे पाणी अडवा-पाणी जिरवा हा शासनाचा उद्देश सफल होणार असून, यामुळे डास निर्मुलनाला ही मदत होणार असल्याने या कामी ग्रामस्थानी जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे, अशा सुचना दिल्या आहे. प्रती खड्डा करीता शासनाकडुन 2,500 रु. चे अनुदान मिळणार असल्याचेही प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगीतले तसेच या प्रंसगी सपकाळे यांनी विहीरा पुर्नभरणाची माहीती देतांना सांगीतले की, या कार्यकर्मासाठी तालुक्यातुन सुमारे २०० प्रस्ताव आले असून, यातील २० पुर्नभरणाची कामे पुर्ण झाली आहे. यासाठी शेतक-यांन 12,000 रूपयांचे अनुदान मिळणार आहे असेही सांगीतले.

Add Comment

Protected Content