Home Cities जळगाव डॉ. निलेश शिंपी यांचे निधन

डॉ. निलेश शिंपी यांचे निधन

0
180
dr nilesh shimpi


dr nilesh shimpi जळगाव प्रतिनिधी । येथील सुप्रसिद्ध जनरल सर्जन तथा श्रीनिवास हॉस्पिटलचे डॉ. निलेश शिंपी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. निलेश शिंपी हे गेल्या १७ वर्षांपासून प्रतापनगरातील श्रीनिवास हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा बजावत होते. आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्यांना राहत्या घरात हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता जळगावत पसरताच त्यांच्या डॉक्टरमित्रांसह काही नातेवाईकांनी श्रीनिवास हॉस्पिटल येथे एकच गर्दी केली असून वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound