यावल तालुक्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर

यावल प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळात तालुक्यातील झालेल्या नुकसानाबाबत पहिला अहवाल आज प्राप्त झाला असून याचे पंचनामे २ तारखेपासून सुरू होणार आहेत.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळा शिवारात दिनांक २६ एप्रील रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या तुफानी वादळी वारा आणि पावसामुळे कोरपावली, महेलखेडी, मोहराळा, सावखेडा सिम, विरावली, नावरे,वढोदे प्रगणे यावल, यावल शहर क्षेत्र, कोळवद, वड्री आदी गावांमध्ये नुकसान झाले होते. यात एकुण पिकाखालील क्षेत्र८७.४२पैकी६ गावांच्या अकारणी अहवालात ४८.१ बाधीत क्षेत्रात केळी पिकांचे ४८ लाख९००० हजार रुपयांचा नुकसानीचा प्राथमीक आकारणी अहवाल यावल तालुका प्रभारी कृषी अधिकारी एस.आर. पाटील यांनी यावल तहसीदार जितेन्द्र कुंवर यांना आज सादर केला आहे. यासाठी कृषी अधिकारी एस.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी निंबाळकर, व माचले, यावल सजा चे तलाठी एस.व्ही. सुर्यवंशी, मुकेश तायडे, व्ही. झेड. सरदार, एम.ई. तायडे, एन.व्ही. मिसाळ,व्ही.बी. नागरे, यांनी त्यांना सहकार्य केले आहे. दरम्यान, प्रत्यक्षात पंचनामे करण्याच्या कार्याला दिनांक २ मे पासुन सुरूवात तलाठी करणार असल्याचे नायब तहसीलदार आर. के.पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

Add Comment

Protected Content