यावल प्रतिनिधी | येथील यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार यावल रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली यावल तालुका पातळीवरील दक्षता समितीच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यावलच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांची या समितीच्या पदसिद्ध उपाध्यक्षपदी तर सदस्य म्हणून यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, सदस्य म्हणुन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, अशासकीय सदस्य म्हणुन संगीता चौधरी, महिला सदस्य म्हणुन सविता लोखंडे, अशासकीय महीला सदस्य मंजुषा सांळुके, विरोधी पक्षाचे सदस्य महेन्द्र चौधरी, विरोधी पक्षाच्या महीला सदस्य वैशाली चौधरी, रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी सदस्य यशवंत जासुद, अनुसुचित जमातीचे प्रतिनिधी यावल पंचायत समितीचे सदस्य सरफराज तडवी, अनुसुचित जातीच्या प्रतिनिधी चंद्रकला इंगळे , डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता भोजराज पाटील यांची तर सदस्य सचिव म्हणून तहसीलदार महेश पवार यांची निवड करण्यात आली आहे .