माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्लीतून लढण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पुढच्या यादीत दिल्लीतील 3 उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सध्याच्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याने आतापर्यंत दिल्लीतील आप सरकारवर अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे गंभीर दिल्लीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीलाच गौतम गंभीर लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आज त्याचा पक्षप्रवेश झाला. यावेळी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, रविशंकर प्रसाद यांनी गंभीरचे स्वागत केले. तसेच लोकसभेसाठी त्याला संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. मात्र त्याची घोषणा करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो. देश सेवा करण्याची मला भाजपने संधी दिली यामुळे आभार मानतो, असे गंभीरने यावेळी सांगितले.

Add Comment

Protected Content