शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी पथनाट्याचा उपक्रम (व्हिडीओ)

yaval nnews

यावल प्रतिनिधी । येथील जिल्हा आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य आदिवासी यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकासाच्या विधायक योजनांची माहिती सामाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याव्दारे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यावल येथील आदिवासी एकात्मीक प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून दि. ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनापासून जिल्हाधिकारी डॉ.आविनाश ढाकणे, ना. हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, जिल्हा आदीवासी प्रकल्प स्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षा मिना तडवी व जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय विविध विधायक योजनांची माहिती सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम भागात छोट्या छोट्या गावात आणि पाड्यांवर राहणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाटयव्दारे जनजागृती अभियान मोहीमचे शुभारंभ करण्यात आले होते.

गेल्या एका महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली चोपडा, यावल, आणि रावेर येथे शंभर टक्के आदीवासी तालुक्यातील ६० गावांमध्ये पथनाट्व्दारा आदीवासी जनजागृती अभियान राबवित आहेत. आदीवासी समाज बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहीती देण्याकरीता जळगाव येथील दिशा संस्थेच्या वतीने पथनाट्यव्दारे जनजागृती करण्यात येत असून या पथनाटयाच्या सादरीकरणात विनोद ढगे, सचिन महाजन, रोशन गांधी, दुर्गेश अंबेकर, देवराज बोरसे, महेश पाटील या कलावंतानी सहभाग नोंदविला. आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार जितेद्र कुवर, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे आणि आदीवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, कार्यालय अधिक्षक आर.बी. अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदीवासी जनजागृती पथनाटय अभियानाचा समारोप करण्यात आला.

Protected Content