किरकोळ वादातून तरुणींनी फोडले दुकानाचे काऊंटर

jalgaon Crime news

जळगाव प्रतिनिधी । झेरॉक्सचे पैसे जास्त घेत असल्याचे सांगून दोन तरूणींनी झेरॉक्स दुकानावरील काऊंटरच्या काचा फोडल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पद्मजा घन:श्याम पाटील (वय-40) रा. विद्यूत कॉलनी यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आयएमआर महाविद्यालयासमोर भाड्याने दुकान घेवून त्याठिकाणी शालेय वस्तू आणि झेरॉक्स दुकान आहे. आज दुपारी 1 वाजेच्या दुकानावर दोन तरूणी झेरॉक्स काढण्यासाठी आल्या. दुकानदार महिलेने झेरॉक्स काढल्यानंरत दोन रूपये प्रमाणे झेरॉक्सचे पैसे मागितले. झेरॉक्सच्या दरावरून दुकानदार महिला आणि दोन्ही तरूणींनी हुज्जत घातली. यात महिलेला शिवीगाळ देखील केली. दरम्यान संतापाच्या भरात मुलींनी काऊंटर दुकावरील टेबलाच्या काचा फोडून काऊंटरचे नुकसान केले असून दुकानदार महिलेला अंगावर धावून आल्यात. काचा फोडल्यानंतर पद्मजा महिलेच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात दोन्ही तरूणींच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सूरू होते.

Protected Content