वाय. वाय. पाटील यांना जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज यशवंत (वाय. वाय.) पाटील यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जळगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात चोपडाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पाटील यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप तळवलकर, डॉ. अक्षय बाऊस्कर, विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, सल्लागार के. यू. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वाय. वाय. पाटील यांना हा सन्मान क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पोहचवण्याच्या योगदानासाठी देण्यात आला आहे. या यशाबद्दल श्री वासुदेवबाबा आध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव जगन्नाथ कोळी, विद्यालयाचे प्राचार्य व्ही. जी. तेली, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, व गावकऱ्यांनी अभिनंदन करत पाटील सरांच्या कार्याची स्तुती केली आहे.

Protected Content