बंडखोर आमदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदारांनी केलेल्या बंडखोरीने राज्यात मविआ सरकार अस्थिर झाले आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयच्या सुत्रांकडून वृत्त दिले आहे.

 

गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास १५ आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. शिवसेनेचे भाजपासोबत हातमिळवणी करून नैसर्गिक युती करावी आणि राज्यात सत्ता स्थापन करावी, अशी अट बंडखोर आमदारांच्या गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घालण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णयमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Protected Content