जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील परिसरातून वायु दलातील मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर पेालिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ममता राहूल कश्यप (वय २०) रा. खिसोरा, नवागड जि. छत्तीसगढ असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, छत्तीसगढ राज्यातील वायु दलातील अधिकारी असलेल्या राहूल कश्यप यांची पत्नी ममता कश्यप ह्या प्रवासात ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे उतरली. त्यानंतर तेथून जळगाव शहरात पोहचली . ६ वाजून ४० मिनिटांनी ती जळगाव शहरातील बिग बाजार येथे पोहचली. याठिकाणाहून ती कुणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेही मिळून आली नाही, अखेर नातेवाईकाने शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी शहर पोलिसात ममता कश्यप ह्या बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनुसार जळगाव शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. उंची ५ फूट, चार इंच, रंगाने गोरी, चेहरा लांबट, शरीराने सडपातळ, केस काळे, लहान, अंगात गुलाबी रंगाचा टीशर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, हातावर गोंदलेले, सोबत मोबाईल असे ममता हिचे वर्णन असून ती कुणालाही आढळून आल्यास शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुनंदा तेली ह्या करीत आहेत.