Home Cities अमळनेर अमळनेरात २७ एप्रिलला कुस्त्यांची महादंगल; देवा थापा आणि शेरा पैलवान आमनेसामने

अमळनेरात २७ एप्रिलला कुस्त्यांची महादंगल; देवा थापा आणि शेरा पैलवान आमनेसामने


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील कुस्ती प्रेमींसाठी उत्साहवर्धक बातमी आहे. बंगाली फाईलमधील बालवीर व्यायामशाळेच्या वतीने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांची भव्य महादंगल आयोजित करण्यात आली आहे. ही दंगल इंदिरा भवनच्या मागे, ग्रामीण रुग्णालयासमोरील मैदानावर रंगणार असून देशभरातील नामवंत पैलवानांचा सहभाग यामध्ये पाहायला मिळणार आहे.

या महादंगलचे विशेष आकर्षण म्हणजे नेपाळ केसरी देवा थापा आणि हरियाणा केसरी शेरा पैलवान यांच्यातील मुख्य कुस्ती होय. ही कुस्ती अतिशय चुरशीची आणि प्रेक्षणीय ठरणार असून यासाठी तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

दुसरी महत्त्वाची कुस्ती धुळे येथील ऋतिक राजपूत आणि दिल्लीचे शमशाद पैलवान यांच्यात रंगणार असून यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय एकूण १३ स्पर्धात्मक कुस्त्या या मैदानावर पाहायला मिळणार आहेत.

या कुस्ती महादंगलचे आयोजन भरत पवार यांनी केले असून पंच म्हणून युनूस पैलवान, आप्पा पाटील, विनोद पैलवान आणि शकील पैलवान काम पाहणार आहेत. या उपक्रमाला बालवीर व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी व्यायामशाळा आणि दि प्रतापकुमार व्यायामशाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.


Protected Content

Play sound