भाजपा स्थापना दिनानिमित्त पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसानिमित्त ६ एप्रिल रोजी जामनेर येथे बूथ क्रमांक ५८ मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर भाजपा स्थापना दिवसानिमित्त ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जामनेरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन, माजी जि.प. सदस्य जे.के. चव्हाण, अतिश झाल्टे, दीपक तायडे, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पाटील, रवींद्र सूर्यवंशी, श्रीराम महाजन, सुनील कलाल, निलेश सिसोदे यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content