जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सकाळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी योगासने व प्राणायम केले.
विद्यालयातील क्रीडा शिक्षक व योगशिक्षक डी. जी.महाजन यांनी “योग” व दैनंदिन जीवनातील महत्त्व याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर सर्वांचा पूरक व्यायाम घेऊन महाजन सरांनी आसनांचे व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आचारणाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.