उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योग दिवस

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आज जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नॅशनल मेडिकल कौन्सिल यांच्या आदेशानुसार गेल्या 10  दिवसापासून योगाचे निरंतर अभ्यास वर्ग महाविद्यालयात होत असून याचा फायदा तेथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला आहे.आज जागतिक योगा दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी, प्राणायाम,  योगासनांचे प्रात्यक्षित सादर केले.

या कार्यक्रमात गोदावरी समूहाचे संस्थापक अध्यक्ष व रावेरचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदय विकार तज्ञ डॉ. वैभव पाटील महाविद्यालयाचे रजिस्टार प्रमोद भिरूड, होमोपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. पाटील महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता श्री. देशमुख सर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बोरले,  श्री प्रविण कोल्हे,महाविद्यालयातील कर्मचारी आणि  विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content