पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील लाडशाकीय वाणी समाज महिला मंडळाकडून १० जुन हा जागतिक दृष्टी दान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ पारोळा तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लुणावत नेत्रालयाच्या डॉ. राजकुमारी सुरेशजी जैन व अध्यक्षा प्रा. वर्षा प्रकाश पुरकर यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला.
नेत्रदान विषयक कार्यावर अमुल्य असे योगदान, राष्ट्रीय व राज्य पातळीवर असलेल्या डॉ. राजकुमारी सुरेश जैन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्था कडून प्रोत्साहन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा सत्कार यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. राजकुमारी जैन यांनी सांगितले की ज्यांना जन्मापासून अंधत्व आहे काही कारणाने ज्यांची दृष्टी गेली त्यांना हे जग पहाता यावे यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये नेत्रदानाची जागरुकता निर्माण होणे खुप गरजेचे आहे बालकापासून ते १०० वर्षाच्या वृद्धापर्यंत चष्मा असणारे, मोतीबिंदुची शस्त्रक्रिया झालेले सुद्धा नेत्रदान करू शकतात तसेच त्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व नेत्रदान कसे करावे त्याची माहिती त्यांनी दिली.या कार्यक्रमात सर्व उपस्थित महिलांना नेत्रदानाची प्रेरणा मिळाली. लाखोच्या संख्येने अंधकारमय जीवन जगणाऱ्या अंध व्यक्तीच्या जीवनातील अंधकार दुर करण्याचा महिलांनी संकल्प केला. त्याबद्दल डॉ. राजकुमारी जैन यांनी सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरव केला. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन नीता नावरकर व शीतल टिपरे यांनी केले. तर आभार सौ. वृषाली मालपुरे यांनी मानलेल व कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या संचालक मंडळाने परिश्रम घेतले.