यावल येथे जागतिक आदिवासी दिवस हर्षोल्हासात

यावल प्रतिनिधी । येथील आदिवासी भिल एकता मंचच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. 

यावल येथील नगर परिसरातील रेणुकामाता मंदीर जवळ प्रांगणावर आज आदिवासी जागतिक दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदीवासी भिल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी, यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते अतुल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्यासह आदीवासी तडवी भिल एकता मंचचे राज्य उपाध्यक्ष सलीम तडवी, राज्य सदस्य समिर तडवी, जिल्हा कार्यध्यक्ष फिरोज तडवी, मुबारक तडवी, सकावत तडवी, जिल्हा उपाध्यक्ष कालुशेठ तडवी व रबील तडवी, जिल्हा संघटक कुरबान तडवी, तालुका अध्यक्ष सरदार तडवी, जिल्हा सचिव रोहीत तडवी, दिपक मगरे आदी पदधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदीवासी दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात क्रांतीविर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, खाज्या नायक, रानी दुर्गावती, तंट्या मामा भिल अशा थोर समाज क्रांतीवीर व आदीवासी बांधवांसाठी आपल्या प्राणांची आहुर्ती देणाऱ्या थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी नगराध्यक्ष व गटनेते अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, स्वातंत्र्याच्या नंतर जवळपास मागील पन्नास वर्षापुर्वी जंगलातील वाडा वस्ती, तांडा अशा ठिकाणी शासनाच्या वतीने आदीवासी बांधवांसाठी शाळा व वस्तीगृह आणि विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या असून दुर्भाग्याने आज ही शासनाच्या पुरेपुर योजना या आदीवासी बांधवांच्या वस्तीवर पहोचलेल्या नसल्याचे दिसून येत असुन आदीवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आदीवासी तडवी भिल एकता मंचच्या वतीने होत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, एम.बी.तडवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान आज जागतिक आदीवासी दिनानिमित्त यावलसह जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, जामनेर, मुक्ताईनगरसह औरंगाबाद, सिल्लोड या विविध ठिकाणी देखील जागतिक आदीवासी दिवस साजरा करून जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आल्याची माहीती आदीवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांनी दिली.

 

Protected Content