भुसावळात आदिवासी दिनानिमित्त सत्कार समारंभ

भुसावळ प्रतिनिधी । शहर कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे आदिवासी दिनानिमित्त नसरवांजी फाईल सैलानी बाबा दरगाह जवळ आदिवासी बांधवांचा पुष्पहार व शाल देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ अमीना बुरान तडवी, अब्दुल दीलदार तडवी, विरकुमार ईदा, विमल ईदा, अनवर दीलदार तडवी यांच्यासह आदी बांधवांचे पुष्पहार व शाल देऊन जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यॉक विभागाचे जीला अध्यक्ष मो मुनव्वर खान, शहर अध्यक्ष रविन्द्र नीकंम, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सलीम गवली, तालुका अध्यक्ष अकील शहर सचीव हमीद शेखर यांनी सत्कार केला.

याप्रसंगी शहर उपाध्यक्ष विलास खरात, शहर उपाध्यक्ष संतोष सालवे, राजेश डोगरदीवे शहर महीला काँग्रेस उपाध्यक्ष सुजाता सपकाडे, दुर्गाबाइ सोनवणे, सपना ताई पगारे, शहर उपाध्यक्ष हमीदा गवली, तनवीर शेख, जानी, गवळी व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमचे आयोजन शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी यांनी केले.

 

Protected Content