मँचेस्टर वृत्तसंस्था । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे.
आज सूर्यानंही दर्शन दिलं असून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून सरावही केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार ओल्ड ट्रॅफर्डवर पाऊस पडण्याची शक्यता 0 ते 10 टक्केच आहे. ढगाळ वातावरण असेल, परंतु अधुनमधून सूर्याची कृपा होईल. त्यामुळे हा सामना तेथील वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता) सुरू होईल. सुरुवातीचे दोन तास लख्ख सुर्यप्रकाश असेल आणि त्यामुळे ग्राऊंड्समनला मैदान सुकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. पंरतू सायंकाळी 5 वाजता पाऊस येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. आज सूर्यानंही दर्शन दिलं असून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून सरावही केला.