जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात जिलहाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील तलाठी, मंळाधिकारी, सेतू चालक, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी ई-हक्क प्रणाली संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी मार्गदर्शन केले.
लोकाभिमुख प्रशासनासाठी ई हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार आहे. नागरीकांना घरबसल्या तलाठी यांच्याकडे बोजा दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे, एकुक कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संकणीकृत सातबारा व हस्तलिखीत सातबारा दुरूस्ती करणे अशी सात प्रकारांची खातेदार यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्जानुसार कार्यवाहीबाबत माहितीच्या संदेश लागतीच संबंधित खातेदाराला प्राप्त होणार आहे. तसेच कार्यवाही झाली याबाबत देखील लागलीच तसा संदेश खातेदारांना प्राप्त होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचन भवनात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी ई हक्क प्रणाली संदर्भात जिल्ह्यातील तलाठी, मंळाधिकारी, सेतू चालक, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि राष्ट्रीयकृत बँकांसाठी कार्यशाळा घेतली. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार असून राष्ट्रीय कृत बँका, पतसंस्था व नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.