प्रधानमंत्री आवास योजनेत धनाढ्य लोकांची नावे ; मनसेचा आरोप

yaval

 

यावल ( प्रतिनिधि) येथील नगर परिषदेव्दारे राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत अनेक धनाढ्य लोकांची नावे असल्याचा आरोप होत आहे. गोरगरीब व बेघर नागरीकांसाठी ही योजना असुन यात काही नगरसेवकांनी सुचवलेल्या लाभार्थ्याच्या नावावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून यासंदर्भात यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार वजा निवेदन दिले आहे.

 

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेव्दारे दिलेल्या लेखी सुचना तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र नव निर्माण सेनेने दिनांक २५ फेब्रुवार २०१९ ला यावल नगर परिषदव्दारे शहरातील बेघर वस्तीत राहणाऱ्या गोर गरीब नागरीकांसाठी महत्वकांशी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या कार्यासंदर्भात माहिती मिळवली असता, यात लाभार्थ्यांच्या यादीत नको त्या मंडळीची घरकुल योजनेचे लाभार्थी म्हणुन नावे समोर आली आहे. या मुळे प्रधानमंत्री आवास योजना ही बेघर गोर गरीबांसाठी की, श्रीमंतासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत सुमारे ३०० ते ३५० लाभार्थ्यांची निवड नगर परिषदव्दारे कारण्यात आलेली असुन लाभार्थ्यांची निवडीचे निकष व नियमावली ही सर्व धाब्यावर बसवुन करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार ही योजना आर्थीक दुर्बल घटकासाठी असतांना यात अनेक लाभार्थी पात्र नसतांना देखील नगर परिषदचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी ‘तेरी भी चुप, मेरी चुप’ अशा पद्धतीचा कारभार राबवित आहे. नगर परिषदच्या या भोंगळ कारभाराचा फटका हा खऱ्या अर्थाने पात्र अशा झोपडपट्टीत राहणाऱ्या , गोरगरीब आर्थीकदृष्टया दूर्बल घटक यांना बसत आहे. तरी यावल नगर परिषदव्दारे या सर्व प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तसेच नगर परिषदेने या संदर्भात केलेल्या ठरावाची माहीती तात्काळ तिन दिवसात द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेव्दारे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर मनसेचे तालुका सचिव संजय नन्नवरे, यावल शहराध्यक्ष चेतन आढळकर, मोहसीन खान, आबीद कच्छी, ईस्माइल खान,सुबान शेख आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव संजय तन्नवरे यांनी यावल नगर परिषदव्दारे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची फेरचौकशी करण्यात खऱ्या व पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा, अशी आपल्या पक्षाची भुमिका असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

Add Comment

Protected Content