जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी प्रयत्न करत विद्यार्थ्यांच्या यशस्वी करिअरसाठी तसेच त्यांच्यात कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक बदल व्हावेत यासाठी महाविद्यालयात चार दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
त्याच उपक्रमांतर्गत या वर्षी ‘डेल कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर’ प्रा.राहुल त्रिवेदी यांनी एमबीए प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चार दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यात सुरुवातीला त्यांनी ‘सायको मॅट्रिक असिंसिमेट’ घेत विद्यार्थ्यांची बोद्धिक पातळी तपासली. ज्या विध्यार्थ्याला त्यांनी विविध असाइनमेट दिलेत व विध्यार्थ्यानीही आपली बोद्धिक क्षमता वापरत सदर कार्यशाळेत प्रात्याक्षिके सादर केलीत. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हटले की, “यश नशिबाने मिळत नाही व वैभव कधीच अपघाताने मिळत नाही. जे वैभवसंपन्न व यशस्वी झाले त्यांनी स्वतःला अधिक उत्पादनक्षम व प्रभावी बनवण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या तर उत्कृष्ट होईल. जर तुम्हाला आयुष्यात सुपर सक्सेस मिळवायचे असेल तर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सवयींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत” असे आवाहन करत त्यांनी अल्पावधी, मध्यावधी आणि दीर्घकालीन आयुष्याची ध्येय निश्चितीचे प्रकार त्यांनी विध्यार्थ्यांना उलगडून सांगितले.
संघ भावना आणि त्यातून प्राप्त होणारी उर्जा व विचारांचे आदान प्रधान यांचेही मुद्दे स्पष्ट करत ‘व्यक्ती व संघ’ यांचे परस्पर पूरक ध्येय आणि त्या संदर्भातील तज्ञाचे मार्गदर्शन यामुळे जीवनाला मिळणारी दिशा यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. करिअरचा गांभीर्याने विचार करताना सकारात्मक मानसिकता आणि सुदृढ शरीर असायला हवे. ध्येयनिश्चितीसाठी प्रत्येकाने मेहनत करायलाच हवी. पण, त्यासाठी योग्य आराखडा असायला हवा. करिअरच्या संधीचा शोध विद्यार्थ्यांनी स्वत:हून घ्यायला हवा. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यातील ध्येयपूर्तीचा आराखडा तयार करा. जेणेकरून तुम्हाला ध्येयापर्यंत पोचता येईल.” असा सल्ला प्रा. राहुल त्रिवेदी यांनी दिला. या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.