मराठी विज्ञान परिषदतर्फे प्रयोगातून विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागातर्फे मु. जे. महाविद्यालयात बी. एससी.  आणि एम. एससी  च्या विद्यार्थ्यांकरिता “प्रयोगातून विज्ञान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी “प्रयोगातून विज्ञान” हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास जवळपास १५० विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. वासू खडसे यांनी केली तसेच भौतिक शास्त्र विभागाचे,प्रमुख  प्रा. डॉ. के. बी .महाजन यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान, त्यांच्या संकल्पना, प्रयोगातून विज्ञान,होणारा कार्यक्रम याविषयी  सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना.भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. लिधूरे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमादरम्यान प्रा. दिलीप भारंबे यांनी भौतिक शास्त्रातील विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांना त्यामागील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. यात  मेकॅनिकस, इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम, सरफेस टेन्शन,  प्रेशर, लाईट, ऑप्टिक, रिफ्ले्क्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटर्नल रिफ्लेक्शन, ऑप्टिकल फायबर असे  अनेक विविध भौतिकशास्त्राचे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागासह दाखवले.  प्रा.अनिल माळी  यांनी आभार मानले.

यशस्वितेसाठी  महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.तसेच विशेष सहकार्य , मवीप जळगाव चे सभासद आणि पदाधिकारी  शशिकांत नेहते आणि प्रा. डीगंबर कट्यारे यांचे होते.

Protected Content