युवाशक्ती व रायसोनी महाविद्यालयातर्फे निवडणूक कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशन आणि रायसोनी महाविद्यालयातर्फे विद्यापीठ निवडणुकीवर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिल राव, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यापीठ विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सत्यजित साळवे, प्रा. आशिष लाल, संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, रोहन सोनवणे, सिनेट सदस्य दिनेश नाईक उपस्थित होते.

याप्रसंगी अनिल राव म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित व्हावेत, या मुख्य उद्देशाने पुन्हा संबंध महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये नवीन कायद्यांतर्गत या निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. विद्यापीठाच्या कायदे मंडळात म्हणजे व्यवस्थापन परिषदेत विद्यार्थ्यांनी निवडून दिलेला उमेदवार सदस्य राहिल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या परिषदेपुढे प्रत्यक्षात मांडता येतील. उमेदवारी भरणार्‍या विद्यार्थ्यांना निवडणूक अभ्यासणे व समजून घेणे महत्त्वाचे आहे. या निवडणुका पूर्णपणे राजकीय निवडणुका ज्या कायद्याखाली होतात त्याच कायद्याप्रमाणे होतील; मात्र महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप, राजकीय चिन्ह, धर्म, जात, सामाजिक संघटना, बोधचिन्ह, झेंडे, प्रतिमा अशा संहितेत दिलेल्या कोणत्याही संकेत देणार्‍या वस्तूंचा वापर करता येणार नाही, असे सांगितले. प्रा.रफिक शेख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय गर्गे यांनी आभार मानले.

Protected Content