ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात दिक्षा अँपच्या माध्यमातून शिक्षण

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ‘स्टडी फ्रॉम होम’ या उपक्रमामार्फत दिक्षा ॲपच्या मदतीने घरबसल्या अभ्यासासह चाचण्या सोडविण्यात येत आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.जे. सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षकांनी दीक्षा अँप च्या माध्यमातून मोबाईलद्वारे विद्यार्थी पालक ग्रुपवर गृहपाठ देऊन ऑनलाईन चाचण्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना पालकांनी आपल्या मोबाईलवर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत करावी, अशा सूचना शिक्षक देत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊन काळात घरात बसून या चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात तसेच दिक्षाअँपचा वापर करावा.

दररोज दिले जाणारे ऑडिओ, व्हिडीओ कृतीयुक्त शिक्षणाचे माध्यमातून पाहावे, ऐकावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्याचे काम विदयालायचे प्राचार्य, उपशिक्षक करीत आहेत. सदर केंद्रप्रमुख संजय पाटील यांनी उपक्रमाची अंमलबजावणी केल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक केले आहे.

Protected Content