फळरोप वाटीकेतील कामगारांना मानधन न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । येथील फळरोप वाटीकेतील महिला कामगारांना १४ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने तहसिल कार्यालयासमोर दि. २७ जानेवारी पासून साखळी उपोषणास बसल्या असून २ दिवसात न्याय न मिळाल्यास दि. ३० जानेवारी पासून आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १० व जामनेर तालुक्यातील ६ महिला रोजगार, पाचोरा व जामनेर कार्यालयाच्या कृषी कार्यालयातील फळरोप वाटीकेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून या महिलांना डिसेंबर २०१९ पासून मानधन मिळालेले नसल्याने भारतीय मजदूर संघ जळगाव या संघटनेच्या माध्यमातून पाचोरा येथील मीराबाई कोळी, बेबाबाई पाटील, सुरेखाबाई  चौधरी, चंद्रकला पाटील, सोनाबाई चौधरी, दुर्गाबाई शिंदे, लिलाबाई पाटील, वात्सलबाई कोळी, राजू खराडे, अरुण यादव, जामनेर येथील अहिल्याबाई तायडे, द्वारकाबाई गायकवाड, आशाबाई पोळ, निर्मलाबाई वराडे, रुखमाबाई झाल्टे, या महिला दि. २७ जानेवारी पासून साखळी उपोषणास बसल्या असून त्यांना २ दिवसात न्याय न मिळाल्यास दि. ३० जानेवारी पासून आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसणार आहे. याबाबत भारतीय मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पी.जे. पाटील , नगरपरिषद कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष धनराज पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष किशोर बारावकर, पप्पू राजपूत यांनीही उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/146129600541573

Protected Content