वीज कामगार, अभियंता कृती समितीचे विविध मागण्यांसाठी २४ पासून काम बंद आंदोलन

बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देण्यासही विविध मागण्यांसाठी २४ मे पासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. 

 

आंदोलनाच्या दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, राज्य सरकार कडून व वीज कंपन्या व्यवस्थापनाकडून वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कामगार, सहाय्यक व प्रशिक्षणार्थी हे महत्त्वाचे घटक असतांना सुध्दा यांना कोवीड-१९ महामारीच्या काळात फ्रंन्टलाईन वर्करचा दर्जा न देणे, कंपनी कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे तातडीने लसीकरण न करणे, संघटनांसोबत चर्चा न करता महामारीच्या काळात मेडिक्लेमच्या टी.पी.ए. मध्ये परस्पर बदल करणे, कोवीड १९ मुळे मृत्यु पावलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाखां ऐवजी रु.३० लाख सानुग्रह अनुदान देणे व वीज बील वसुलीसाठी कामगारांवर सक्ती करणे यांसह विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीने २४ मे पासून काम बंद आंदोलनाची नोटीस देण्यात आली आहे.

 

काम बंद आंदोलनात कंत्राटी कामगार, सर्व सहाय्यक, प्रशिणार्थी यांनी देखील सहभाग नोंदवावा अशी माहिती वीज कामगार, अभिंयते, अधिकारी संयुक्त कृती समिती यांचा वतीने सांगण्यात आले आहे.

Protected Content