जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निमगव्हाण ते वैजापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या २८ कि.मी. लांबीच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाला अखेर प्रत्यक्षात सुरूवात झाली असून, या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाबाबत कंत्राटदाराला महत्वाच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार सोनवणे यांनी काम गुणवत्तापूर्वक आणि निर्धारित मापदंडांनुसार पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. नागरिकांच्या सहकार्यानेच हे काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, ही आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, ॲड. शिवराज पाटील, संचालक किरण देवराज, निवृत्ती पाटील, गणेश पाटील, संदीप सोनवणे, निश्चल पाटील सर, दशरथ बाविस्कर, राजेंद्र पाटील सर, सीताराम कोळी, दीपक चौधरी, प्रदीप बारी, कैलास बाविस्कर, अनु ठाकूर, समाधान कोळी, अमोल कोळी, अशोक पाटील, गजानन कोळी, धनराज पाटील, सुनील पाटील, प्रवीण धनगर, बाळु पाटील, अशोक बापू पाटील, मधुकर पाटील, प्रताप पाटील, योगेश पाटील, वाल्मीक पाटील, लखा धीवर, भैय्या धीवर, धना पांचाळ, विकास भोई, धनराज बाविसकर, गब्बर पाटील, सुभाष कोळी, रमेश पाटील, केशव बाविसकर, बाळू कोळी, सुनिल टेलर, संभाजी पाटील, भिका पाटील तसेच निमगव्हाण परिसरातील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या विकासामुळे वैजापूर तालुक्याच्या दृष्टीने एक मोठी पायाभूत सुविधा निर्माण होत असून, वाहतूक सोयीची होण्यासह अपघातांचे प्रमाणही कमी होईल. तसेच शेतीमालाचा बाजारपेठांपर्यंत जलद पुरवठा शक्य होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि नागरिकांना त्याचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.



