गजानन महाराज मंदिरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू; अतुल पाटलांचा पुढाकर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील विरार नगर भागात असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला.

मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी गजानन महाराज भक्त परिवार आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना विनंतीपत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सदर काम नगर्रोत्थान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले. यापूर्वी पाटील यांच्या कार्यकाळात मंदिर परिसरात भव्य सभामंडप आणि सुशोभीकरण योजनेतून बगीच्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता पेव्हर ब्लॉक बसविल्याने परिसर अधिक आकर्षक आणि सुविधा युक्त होणार आहे.

शुभारंभप्रसंगी उद्योजक भैय्यासाहेब चौधरी, निवृत्त प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पी. एम. जोशी, प्रा. अशोक काटकर, प्रा. संजय कदम, मनिष दादा चौधरी, शरद चतुर, महेश सराफ, विजय चौधरी आदींच्या हस्ते नारळ फोडून कामाचा आरंभ झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अनिल पाठक, अशोक भंडारी, वासुदेव आमोदकर, प्रमोद बापू, नीलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कामाच्या सुरुवातीमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाची लाट पसरली असून, सर्वांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Protected Content