यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे गावातील आमदार यांच्या स्थानिक निधीतुन मागील तिन वर्षापासुन सुरू असलेल्या व्यायाम शाळेचे काम अद्यापही अपुर्ण असल्याने हे काम तात्काळ पुर्ण करावे अशी मागणी यावल तालुका भिमआर्मीने केली आहे.
या संदर्भात भिमआर्मीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , सार्वजानिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या दिलेल्या निवदनात म्हटले आहे की , संपुर्ण देशात मागील सहा महीन्यापासुन कोरोना विषाणुसंसर्गजन्य परिस्थितीमुळे महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लावण्यात आली होती. याचा परिणामी आपण सर्वानी सोसावे लागले असुन पण आता संचारबंदी हटविण्यात आल्याने जनजिवन हळुहळु पुर्वपदावर येत आहे. येणाऱ्या काळात सैन्य भरती व पोलीस भरतीचा येणार असल्याने आपल्या चुंचाळे गावातील व परिसरातील युवकांना व तरूणांनी शारीरिक पात्रता पुर्ण करण्यासाठी तयार सुरू आहे , परन्तु शासन पातळीवर सुरू झाल्या असुन , मात्र चुंचाळे गावात आमदार यांच्या २o१७मध्ये सुमारे ९ लाख रुपयांचा स्थानिक निधीतुन व्यायमशाळा बांधकामास मान्यता मिळुन कामाची सुरूवात देखील झाली होती. मात्र तिन वर्ष झालीत तरी देखील व्यायमशाळेचे बांधकाम हे अद्याप ही अपुर्ण अवस्थेत असल्याने या अपुर्ण अवस्थेत सोडलेल्या व्यायम शाळेचा काही दारूडे दुरुपयोग करीत असल्याने युवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ मागील तिन वर्षापासुन रखडलेले व्यायम शाळेचे काम पुर्ण करावे बांधकाम पुर्ण झाल्यास परिसरातील युवकांना याचा लाभ मिळणार असुन सदरच्या कामास विलंब का झाले याचीही चौकशी करावी अशी मागणीचे लिखित निवेदनाद्वारे भिम आर्मीचे जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदाशिव यांच्यासह तालुका हेमराज तायडे , तालुका सचिव प्रशांत तायडे , भिमराव सावळे , शिवाजी गजरे , निखिल सावळे यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस पाटील आणी सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे केली आहे.