यावल प्रतिनिधी- मला गुलाबपुष्प व पुष्पगुच्छ देण्याऐवजी आपण आपल्या सेवा कर्तव्याची जाणीव ठेवुन शिस्तप्रिय मार्गाने नागरीकांची कामे करा तर लोक प्रसन्न होवुन तुम्हाला पुष्प देतील. असे मनोगत यावल येथे आलेल्या पहील्याच भेटी दरम्यान फैजपुर विभागाचे नुतन प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी स्वागत सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
फैजपुर विभागाचे नुतन प्रांत अधिकारी कैलास कडलग हे यावल येथील तहसील कार्यालयात आले असता त्यांनी महसुलच्या विविध विषयांवर त्यांनी अधिकारी वर्गाशी माहीती घेवुन मार्गदर्शन केले . यावेळी यावल तहसीलच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार . नायब तहसीलदार आर.डी . पाटील , पुरवठा विभाग निरिक्षक अंकीता वाघमळे, पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन सकावत तडवी संगांयोच्या नायब तहसीलदार बी .बी . भुसावरे , महसुल अव्वल कारकुन निशा जाधव , इंगायोचे रवीन्द्र मिस्त्रि, अव्वल कारकुन इंगळे ,दिपक बाविस्कर , दिपक भुतेकर, कुळकायदा विभागाचे अव्वल कारकुन रवीन्द्र माळी आदींनी नुतन प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत सत्कार केले.