जळगाव प्रतिनिधी । जिल्हा महिला असोसिएशन आणि भूमाता ब्रिगेडने काल मध्यरात्री शहरातून रॅली काढून निर्भयता आणि स्त्री-पुरूष समानतेचा नारा बुलंद केला.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, महापौर सीमा भोळे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्ष राजकुमारी बाल्दी यांच्यासह शेकडो महिला व पुरूष या अनोख्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. काव्य रत्नावली चौकापासून सुरू झालेली ही मशाल रॅली छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या दरम्यान, विविध घोषण देण्यात आल्या.
पहा : नारीशक्तीचा नारा बुलंद करणार्या या रॅलीचा व्हिडीओ.