रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची पूर्व तयारी जोरात सुरु आहे. या प्रक्रियेत मतदार नोंदणी वाढवी यासाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय कामास सहकार्य करावें असे आवाहन तहसीलदार बंडू कापसे यांनी महिला मंडळं पदाधिकारी यांच्या घेतलेल्या बैठकीत आवाहन केले आहे.
या बैठकीत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी. पाटील, श्री पवार, सहा. गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे यांच्या सह श्रीमती कांता बोरा जागृति महिला विकास मंडळ रावेर, अलका विकास श्रावगी शारदा महिला मंडळ रावेर, सुनिता विलास विखे ब्रम्ह वादिनी महिला मंडळ रावेर, सुनिता उज्वल डेरेकर जैन सरस्वती महिला मंडळ रावेर, जयश्री अशोक वाणी चिवास मंडळ रावेर, गजाला तबस्सूम शेख कमालोद्दीन, निवडणूक कर्मचारी तडवी, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.
सदर बैठकीत फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नियोजन करण्यात येत असून नवीन मतदार नोंदणी अर्ज कसा करावा आणि कोण कोणते कागदपत्रे सादर करावीत या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तर बाहेर गावाहून नवीन सून म्हणून आलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत, तसेच नवं युवक युवती जे नव मतदार आहेत त्यांची नोंदणी आवश्यक आहे. या विषयक विविध ठिकाणी जन जागृतीचे शिबीर घेण्यात यावेत असेही ठरविण्यात आले.