मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार यांनी महिला सक्षमीकरणा साठी अनेक निर्णय घेतले त्याचे दुरोगामी परीणाम होऊन महिलांच्या कार्य कर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी हे निर्णय मैलाचा दगड ठरले त्यामुळे घराचा उंबरठा ओलांडण्याची मनाई असलेल्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचे पाळेमुळे खोल रुजलेले असतात आणि त्याच्या पारंब्या पासून नविन वटवृक्षाची निर्मिती होते त्याचप्रमाणे शरद पवारांनी घेतलेले निर्णय महिलांच्या जीवनावर दुरोगामी परिणाम करून महिलांच्या कार्यकर्तृत्वाला बळ देणारे आणि त्यांना उंच भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश देणारे ठरले त्यामुळे शरद पवार हे महिलांच्या सक्षमिकरणासाठी आधारवड ठरले असे म्हणता येईल यालाच अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडी तर्फे वटवृक्ष लागवडीचे “शरद वृक्ष” अभियान राबविण्यात येणार आहे. याअभियाना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी या पावसाळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि महिला भगिनींनी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून पुढील पिढीला चांगले पर्यावरण द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला भगिनींना आवाहन केले आहे.
या अनोख्या अभियाना बद्दल माहिती देताना रोहिणी खडसे म्हणाल्या ‘महिलांच्या पंखाना बळ दिले तर त्या प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेऊ शकतात असा विश्वास असल्याने शरद पवार यांनी संरक्षणमंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्यदलात प्रवेश देऊन संरक्षण खात्यात महिलांना ११ टक्के आरक्षण दिले. महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी शरद पवार यांनी १९९३ मध्ये महिला आयोगाची स्थापना केली. महिला व बालविकास विभाग या स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. विभागामार्फत आज महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवर आधारित विविध योजना राबविल्या जातात. १९९३ साली राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देण्याचा शरद पवार यांनी निर्णय घेतला. पुढे २०११ मध्ये हे आरक्षण ५० टक्क्यांवर पोहोचले. त्यामुळेच घराच्या बाहेर निघण्याची मुभा नसलेल्या महिलांना समान संधी मिळाली. त्यामुळे महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकल्या.
या निर्णयामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळाली. शरद पवार यांनी महिला सक्षमीकरणा साठी घेतलेले हे निर्णय ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला फुटणार्या पारंब्या जमिनीच्या खोल भागात जातात आणि त्याला मुळे फुटून पुन्हा वटवृक्ष तयार होतो. त्याप्रमाणे ठरला. या निर्णयांमुळे महिलांना घराचा उंबरठा ओलांडून प्रत्येक क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली त्यामुळे महिलांसाठी शरद पवार हे आधारवड ठरले. याला अनुसरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे शरद वृक्ष अभियान राबविण्यात येणार आहे.