भुवनेश्वर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशा सरकारने सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक दिवसांची पीरियड लीव देण्याची घोषणा केली आहे. ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या की, आजपर्यंत महिलांना पीरियड्स काळात सुट्टी मिळत नाही. आता एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या अंतर्गत महिला मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी त्या सुट्टी घेऊ शकतील. मात्र ही रजा ऐच्छिक असेल म्हणजेच ज्यांना हवी असेल त्यांनाच त्यांना ती हवी असेल तरच मिळेल. हा निर्णय सरकारी तसेच खासगी कंपन्यांनाही लागू होणार आहे. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी दिली जात नव्हती. मात्र आता सरकारने निर्णय घेतला आहे की, या काळात महिलांना सुट्टी दिली जावी. महिला आपल्या आवश्यकतेनुसार सुट्टी घेऊ शकतात. दरम्यान महिलांनी यासाठी अर्ज केल्यानंतरच ही सुट्टी दिली जाईल. जर एखाद्या महिलेला सुट्टी नको असेल तर तिला रजा दिली जाणार नाही.