महिला पत्रकारांनी निर्भयपणे सत्य मांडावे : मंत्री रक्षा खडसे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स तर्फे तृतीय टेबल टेनिस टूर्नामेंटच्या पारितोषिक वितरण समारंभात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला आणि स्पर्धेतील सहभागींच्या क्रीडास्पर्धेतील योगदानाचा सन्मान करण्यात आला. या वर्षीच्या टेबल टेनिस टूर्नामेंट मध्ये आयडब्ल्युपीसी सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. खेळ आणि आरोग्याच्या संवर्धनासाठी आयडब्ल्युपीसीने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी क्रीडाप्रवृत्तीमुळे सहकार्य, चिकाटी आणि आत्मविश्वास कसा वाढतो यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्या म्हणाला की, “महिला केवळ सामाजिक परिवर्तनाच्या वाहक नाहीत तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकदसुद्धा आहेत.त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत दुर्लक्षितांचा आवाज बनत आहेत.”

आयडब्ल्युपीसीच्या माध्यमातून महिला पत्रकारिता अधिक सक्षम होतील आणि देशातील अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रकाशझोतात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयडब्ल्युपीसी महिला पत्रकारांसाठी एक सशक्त आणि गतिशील मंच उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून त्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळींवर प्रगती करू शकतील.

इंडियन विमेन्स प्रेस कॉर्प्स परिवर्तनासाठी एक दीपस्तंभ ठरले आहे. त्यांच्या क्रीडा उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाने #Fit भारतासारख्या महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला आहे, जो संपूर्ण देशभर आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी बोलताना खडसे यांनी अस्मिता योजनेचा उल्लेख केला. महिला पत्रकारांनी निर्भयपणे सत्य मांडावे, समाजातील परिवर्तनाचे माध्यम बनावे आणि देशाच्या विकास प्रक्रियेत आपला मोलाचा वाटा उचलावा असे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला पारूल शर्मा अध्यक्ष Iआयडब्ल्युपीसी, बिन्नी यादव जनरल सेक्रेटरी आणि इतर मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

Protected Content