महिलेचे बंद घर फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविला

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कुलगुरू ड्रीम सीटी परिसरात ५६ वर्षीय महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० मार्च रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर शहरातील कुलगुरू ड्रीम सीटी परिसरात प्रेमलता आबाजी पाटील वय ५६ या महिला वास्तव्याला आहेत. ८ ते ९ मार्च या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातून सव्वा लाख रूपयांची रोकड आणि सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने असा एकुण अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. हीघटना रविवारी ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजात समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० मार्च रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात महिलेने पोलीसात ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करीत आहे.

Protected Content