पुतणी व जेठला मारहाण करून महिलेचा विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रबुद्ध कॉलनी भागात एका महिलेसह पुतणी व जेठ हे पायी जात असतांना तिघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली व महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवार २६ जून रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील नगाव येथील ४२ वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजता महिलाही त्यांची पुतणी व जेठ यांच्यासोबत अमळनेर न्यायालयात आल्या होत्या. येथील काम आटोपून ते घरी जाण्यासाठी प्रबुद्ध कॉलनी भागातून पायी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी हर्षल गिरी मच्छिंद्र गिरी गोसावी मच्छिंद्र गिरी आधार गोसावी सीमा मच्छिंद्र गिरी गोसावी गणेश दयाराम पाटील व एक अनोळखी असे पाच जणांनी काहीही कारण नसतांना तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. व महिलेचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर महिलेने रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हर्षल गिरी मच्छिंद्र गिरी गोसावी मच्छिंद्र गिरी आधार गोसावी सीमा मच्छिंद्र गिरी गोसावी गणेश दयाराम पाटील व एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. वाघाडी ता. शिरपूर जि.धुळे यांच्या विरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.

Protected Content