दुभाजकावर कार आदळल्याने चालकाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवेंद्र जालंदर पवार वय २१ रा. साक्री फोटा भुसावळ असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील साक्री फाटाजवळी देवेंद्र पवार हा आपल्या आईवडील पत्नी आणि भावासोबत वास्तव्याला होते. ते दिपनगर येथील केंद्रात नोकरीला होता. बुधवारी १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता कार क्रमांक (एमएच १९ सीवाय ९६१६) ने भुसावळ येथून दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान दिपनगर येथील उड्डाणपुलाजवळ चालक देवेंद्र पवार याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव कार ही दुभाजकावर आदळली. यात भीषण अपघातात देवेंद्रच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबबात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे.

Protected Content