चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कन्नड घाटात झालेल्या भिषण अपघातात महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “चाळीसगावहून कन्नडकडे जाणाऱ्या एका दुचाकीला कन्नड घाटात शनिवार, ४ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भिषण अपघात झाला. या अपघातात सविता देवचंद राठोड (वय-३३) रा. सितानाईक तांडा कोलवाडी ता. कन्नड या विवाहितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच तिचा दुदैवी मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैयक्तिक अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.” पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भगवान माळी हे करीत आहे.