Home Cities अमळनेर भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात महिला ठार !

भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात महिला ठार !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अतुर्ली येथील महिला रस्त्याने जात असतांना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याबाबत दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना संजय पाटील वय ४७ रा. अंतुर्ली ता. अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वंदना पाटील या महिला आपल्या कुटुंबियासह अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात वास्तव्याला होत्या. रविवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अंतुर्ली ते खापरखेडा रस्त्याने पायी जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच ५४ ए ०१८८) वरील दुचाकीधारकाने भरधाव वेगाने येवून वंदना पाटील यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचे पती संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक भरत निंबा पाटील रा. अतुर्ली ता.अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound