Home क्राईम चारचाकीच्या धडकेत महिला जखमी; अज्ञात चालकावर गुन्हा

चारचाकीच्या धडकेत महिला जखमी; अज्ञात चालकावर गुन्हा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माधुरी किशोर सपकाळे (वय ३५) या महिलेला भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात १९ जुलै रोजी महामार्गावर नशिराबादनजीक घडला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी सपकाळे या दुचाकीवरून जात असताना, एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या खाली पडून जखमी झाल्या. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नशिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अतुल महाजन करत आहेत.


Protected Content

Play sound