Home Cities अमळनेर विजेच्या धक्क्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

विजेच्या धक्क्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

0
295


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मठगव्हाण येथे विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. लताबाई भाऊसाहेब पाटील (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई पाटील या आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या मोटारीला पिन लावण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. लताबाईंना ग्रामीण रुग्णालयात आणले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने मठगव्हाण गावात हळहळ व्यक्त होत आहे. तारकेश्वर गांगुर्डे यांनी दिलेल्या खबरेवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करत आहेत.


Protected Content

Play sound