विजेच्या धक्क्याने जोगेश्वन नगरातील महिलेचा मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यजू प्रतिनिधी । पाणी तापविण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने योगेश्वर नगरातील ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली.  या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मा प्रकाश महाजन (वय-५३) रा. कालिंका माता मदिराजवळ, योगेश्वर नगर या महिला आपल्या पती प्रकाश पंढरीनाथ महाजन, एक मुलगा आणि मुलगीसह वास्तव्याला आहे. दैनंदिनीप्रमाणे प्रकाश महाजन हे रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदीरात देवाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या पत्नी सुष्मा महाजन यांनी अंघोळीला पाणी तापविण्यासाठी लोखंडी बादलीत हिटर लावले होते. थोड्या वेळाने पाणी तापले की नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला त्यात त्या जागीच ठार झाल्या. प्रकाश महाजन हे मंदीरातून घरी आल्यानंतर ही घटना लक्षात आली. शेजारच्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती प्रकाश महाजन, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन आणि पो.कॉ. अनिल कांबळे करीत आहे.

Protected Content